Ad will apear here
Next
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण शनिवारी
श्याम अगरवाल, विश्वनाथ गरुड, सिद्धराम पाटील, शिवाजी गावडे मानकरी
पुणे : विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. २०) भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्या हस्ते एका विशेष समारंभात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी, २० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता फर्ग्युसन कॉलेजच्या अॅम्फी थिएटरमध्ये होणार आहे. 

श्याम अगरवाल
 ‘या पुरस्कार उपक्रमाचे हे नववे वर्ष असून, देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने हे पुरस्कार देण्यात येतात. पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कारासाठी ‘आज का आनंद’ समूहाचे संस्थापक श्याम अगरवाल यांची, युवा पत्रकार पुरस्कारासाठी दै. दिव्य मराठी सोलापूरचे सिद्धराम पाटील, व्यंगचित्रकार पुरस्कारासाठी बारामतीचे शिवाजी गावडे आणि सोशल मीडिया पुरस्कारासाठी पुण्याचे विश्वनाथ गरुड  यांची निवड करण्यात आली आहे.
विश्वनाथ गरुडपुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे १५ हजार रुपये, अन्य तीन पुरस्कार सात हजार ५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ असे आहे’, अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.


पुरस्कार वितरणाविषयी :

दिवस : शनिवार, २० जुलै २०१९ 
वेळ : सकाळी १०.३० वाजता 
स्थळ : फर्ग्युसन कॉलेजचे अॅम्फी थिएटर, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZOJCC
Similar Posts
नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण २० जुलै रोजी पुणे : विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता. २०) विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष न्या. विष्णूजी कोकजे यांच्या हस्ते एका विशेष समारंभात करण्यात येणार आहे.
‘इतिहासाचे विस्मरण हे भारतासमोरचे सर्वांत मोठे आव्हान’ पुणे : ‘इतिहासाची जाणीव असल्याशिवाय आत्मविश्वास येत नाही आणि आत्मविश्वास हरविलेला देश कधीही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाचे विस्मरण हे भारतासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी येथे केले.
‘पत्रकाराला व्यावसायिक दर्जा आणि माध्यमांना जबाबदारीचे भान हवे’ पुणे : ‘पत्रकारिता हा व्यवसाय आहे; मात्र कायद्यात या व्यवसायाला कुठेही मान्यता नाही. त्यामुळे पत्रकाराला व्यावसायिक दर्जा हवा, तसेच माध्यमांना जबाबदारीचे भान हवे,’ असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची वॉर-रूम कार्यान्वित पुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी वॉर-रूम कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून, आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे,’ अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी रविवारी (८ सप्टेंबर) पत्रकारपरिषदेत दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language